NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा.
नांदेड:- नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य अमरनाथजी राजूरकर यांची भरघोस मतांनी निवड झाल्याबद्दल भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी गणेशराव बच्चेवार यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी बालाजी बच्चेवार यांनी आ. अमरनाथजी राजूरकर यांच्या विधान परिषद सदस्य म्हणून मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या माध्यमातून राज्याच्या विकासासोबतच नांदेड जिल्हा आणि नायगाव तालुक्याच्या विविध विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा बालाजी बच्चेवार यांनी व्यक्त केली. तसेच, लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देत विकासभिमुख भूमिका कायम ठेवावी, अशी शुभेच्छाही त्यांनी दिली.
सत्काराला उत्तर देताना अमरनाथजी राजूरकर यांनी सर्वांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरत विकासकामांना प्राधान्य देण्याचा आणि पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या विजयाचे शिल्पकार, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांचीही बालाजी बच्चेवार यांनी यावेळी सदिच्छा भेट घेऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. या प्रसंगी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी गणेशराव बच्चेवार, उद्योगपती ज्ञानेश्वर लोकमनवार, श्री. श्रावण पाटील भिलवंडे, महानगरपालिका माजी सभापती किशोर स्वामी, आकाश बच्चेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.



