25.8 C
New York
Friday, June 26, 2026

Buy now

spot_img
spot_img

धर्माबादच्या मिरची उद्योगाला देशात ओळख मिळवून देणारे उद्योजक शेख अमिरोद्दीन शेख मोहियोद्दिन यांना ‘लोकमत’चा गौरव

NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा.

नांदेड :- धर्माबादच्या मिरची व्यापाराला नवी ओळख मिळवून देणारे आणि ‘DMH’ मसाल्यांच्या माध्यमातून गुणवत्तेचा ब्रँड निर्माण करणारे प्रथितयश उद्योजक शेख अमिरोद्दीन शेख मोहियोद्दिन यांची ‘लोकमत’तर्फे ‘उत्कृष्ट मिरची व्यापारी व उद्योजक’ म्हणून निवड करण्यात आली आहे. आज, २७ जून २०२६ रोजी नांदेड येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

•व्यवसायातील जिद्द आणि प्रगती

१९७५ साली शेख अमिरोद्दीन शेख मोहियोद्दिन यांनी ‘जनता इंडस्ट्रीज’ची स्थापना केली. तेव्हापासून त्यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर धर्माबादच्या मिरची व्यापाराला केवळ मराठवाड्यातच नव्हे, तर परराज्यांसह संपूर्ण देशभर एक नवी ओळख मिळवून दिली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज धर्माबाद हे मिरची व्यापाराचे एक प्रमुख केंद्र म्हणून नावारूपास आले आहे.

•DMH मसाल्यांचा विस्तार

केवळ व्यापारापुरते मर्यादित न राहता, त्यांनी ‘DMH मसाले’ हा दर्जेदार ब्रँड उभा केला. आज महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांत त्यांच्या २० हून अधिक शाखांचे जाळे पसरले असून, देशभरातील विविध शहरांत शोरूमच्या माध्यमातून ते आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यांच्या या उद्योगामुळे ५० जणांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे, तर हंगामाच्या काळात ही संख्या थेट २०० ते ३०० पर्यंत पोहोचते.

•यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक

शेख अमिरोद्दीन शेख मोहियोद्दिन हे केवळ एक यशस्वी व्यावसायिक नसून, त्यांनी सामाजिक बांधिलकीची जपणूकही तितक्याच निष्ठेने केली आहे. दरवर्षी ते राज्यातील २५ ते ५० विविध आश्रमांना सुमारे ५० क्विंटल मिरचीचे मोफत वाटप करतात. त्यांच्या या दानशूरपणामुळे ते समाजातील एक प्रेरणादायी आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून आदराने पाहिले जातात.

त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत ‘लोकमत’ समूहाने त्यांना पुरस्कार देऊन गौरवित केले आहे, ज्याचे संपूर्ण धर्माबाद आणि व्यापारी वर्गात मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

 

 

Related Articles

ताज्या बातम्या