21.2 C
New York
Thursday, March 26, 2026

Buy now

spot_img
spot_img

“रेल्वेच्या प्रलंबित मागण्यांसाठी धर्माबादचे शिष्टमंडळ दिल्लीत; महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्याशी चर्चा”

NANDED | धर्माबाद | युवा रक्षक वृत्तसेवा.

धर्माबाद :-  धर्माबाद रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या प्रलंबित मागण्या आणि रेल्वे सुविधांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आता दिल्ली दरबारी धाव घेतली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांची दिल्ली येथे भेट घेऊन त्यांना धर्माबादच्या रेल्वे प्रश्नांबाबत सविस्तर साकडे घालण्यात आले.

धर्माबाद हे व्यापार आणि प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र असूनही अनेक वर्षांपासून काही प्रमुख मागण्या प्रलंबित आहेत. यामध्ये प्रामुख्याने:

•काही महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना धर्माबाद येथे थांबा (Stoppage) मिळणे.

• रेल्वे स्थानकावरील प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करणे.

• वेळोवेळी निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि रेल्वे वेळापत्रकाबाबत चर्चा करण्यात आली.

या भेटीदरम्यान धर्माबादमधील अनुभवी नेतृत्वाचे शिष्टमंडळ उपस्थित होते. यात मराठवाडा जनहित पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष शंकर अण्णा बोल्लमवाड, सुप्रसिद्ध कंत्राटदार तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उप सभापती मोईजोद्दीन सेठ करखेलीकर आणि गटनेता ताहेर पठाण यांचा समावेश होता.

खासदार अशोकराव चव्हाण यांनी या सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेतल्या असून, रेल्वे मंत्रालयाकडे या प्रश्नांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. या भेटीमुळे धर्माबादच्या रेल्वे विकासाला नवी गती मिळेल, अशी आशा शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.

 

Related Articles

ताज्या बातम्या