23.3 C
New York
Wednesday, July 22, 2026

Buy now

spot_img
spot_img

नांदेडमध्ये राजकीय हालचालींना वेग; बाळासाहेब आंबेडकरांच्या हाकेला साथ देत ‘मुजीब भाई मित्र मंडळा’कडून उद्याच्या ‘महाराष्ट्र बंद’ला जाहीर पाठिंबा

NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा.

नांदेड :- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी विविध मागण्यांसाठी उद्या दिनांक २३ जुलै २०२६ रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या बंदला राज्यभरातून संमिश्र व पाठिंबा मिळत असतानाच, नांदेडमधूनही या आंदोलनाला मोठा  पाठिंबा मिळाला आहे. नांदेडमधील ‘मुजीब भाई मित्र मंडळ’ च्या वतीने अधिकृत पत्रक जाहीर करत या महाराष्ट्र बंदला आपला संपूर्ण पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

संस्थापक अध्यक्ष सय्यद मुजीब सय्यद जाहेद यांच्या नेतृत्वाखालील या मित्र मंडळाने उद्या होणाऱ्या या आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून, याबाबतचे अधिकृत पत्र आणि निवेदन नुकतेच जारी करण्यात आले आहे. या घडामोडीमुळे नांदेडच्या राजकीय वर्तुळात आणि स्थानिक पातळीवर तीव्र चर्चा सुरू झाली असून, प्रशासकीय यंत्रणाही सतर्क झाली आहे.

श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या या आंदोलनाशी सुसंवाद साधत मुजीब भाई मित्र मंडळानेही बंदच्या यशस्वीतेसाठी व जनमानसातील ज्वलंत प्रश्नांवर आपला पाठिंबा दर्शवला आहे. या आंदोलनात मंडळाचे सर्व प्रमुख पदाधिकारी सक्रिय सहभाग नोंदवणार आहे.

 

Related Articles

ताज्या बातम्या