NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा.
नांदेड:- शिवाजी नगर येथील प्रसिद्ध ‘के.सी. फॅशन’K.C. Fashion Mall’ ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवा आणि उत्साहवर्धक उपक्रम सुरू केला आहे. आता दर रविवारी ‘K.C. Fashion Mall’ आपल्या इंस्टाग्राम फॉलोअर्ससाठी विशेष ‘गिव्ह-अवे’ (GiveAway) स्पर्धेचे आयोजन करत असून, यात सहभागी होणाऱ्या भाग्यवान विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू दिली जाते.
या उपक्रमांतर्गत नुकत्याच पार पडलेल्या गेल्या रविवारच्या लकी ड्रॉमध्ये, धनराज मटके हे भाग्यवान विजेते म्हणून निवडले गेले आहेत. ‘K.C. Fashion Mall’ च्या वतीने त्यांना विशेष भेटवस्तू प्रदान करून गौरविण्यात आले.
या उपक्रमाबद्दल माहिती देताना मॉलच्या व्यवस्थापनाने सांगितले की, “आमच्या ग्राहकांचे आणि सोशल मीडिया फॉलोअर्सचे प्रेम आम्हाला नेहमीच प्रोत्साहन देते. हे नाते अधिक घट्ट करण्यासाठी आम्ही दर रविवारी एक ‘गिव्ह-अवे'(GiveAway) स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. दर रविवारी आम्ही एक लकी Winner निवडतो आणि त्यांना मॉलतर्फे खास गिफ्ट दिले जाते.”
आपल्याला मिळालेल्या या भेटवस्तूमुळे धनराज मटके यांनी आनंद व्यक्त केला असून मॉलच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. दर रविवारी आयोजित होणाऱ्या या स्पर्धेमुळे नांदेडमधील फॅशनप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे.
‘K.C. Fashion Mall’ दर रविवारी विविध बक्षिसांच्या स्वरूपात आपल्या ग्राहकांसाठी सरप्राईज घेऊन येत आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी आणि दर रविवारी होणाऱ्या लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांनी मॉलच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्याचे आवाहन ‘K.C. Fashion Mall’ यांनी केले आहे.



