18.8 C
New York
Wednesday, October 8, 2025

Buy now

spot_img
spot_img

व्ही.पी.के समूहाचे अध्यक्ष, शेतकरी नेते कवळे गुरुजी यांची साहेबराव पाटील सोमठाणकर यांच्या निवासस्थानी भेट…..

NANDED | उमरी | यूवा रक्षक वृत्तसेवा.

उमरी :- लोककल्याणकारी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी साहेबराव पाटील सोमठाणकर यांची स्नुषा सरिता दीपक पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राजपत्रित अधिकारी झाल्याबद्दल त्यांच्या घरी जाऊन साहेबराव पाटील व त्यांच्या परिवाराचे अभिनंदन केले. यावेळी जीवन साहेबराव पाटील यांचा वाढदिवस असल्याने लोककल्याणकारी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजींच्या हस्ते अभिष्टचिंतन करण्यात आले.

याप्रसंगी कवळे गुरुजींनी साहेबराव पाटलांचा जुन्या आठवणींचा उजाळा आणि त्यांच्या सोबत असलेला जिव्हाळा सांगितला तसेच सोमठाणा परिसरामध्ये सिंचनाचे क्षेत्र वाढण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा कसा करावा यांची माहिती दिली आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने मेहनत घ्यावी व आपले उत्पन्न कसे वाढवावे याचे सखोल मार्गदर्शन गुरुजी यांनी केले.

याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंधी शेलगाव चे कदममाली पाटील व एकनाथ पाटील तसेच शिवसेनेचे नायगाव तालुका अध्यक्ष श्यामसुंदर व्यंकटराव पाटील कवळे ,सोमठाणा गावचे उपसरपंच विलास साहेबराव पाटील, संदीप व्यंकटराव पाटील कदम , व्यंकटराव शेषराव पाटील कदम, सुरेश पाटील कवळे सह सोमठाणा येथील गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या