NANDED | उमरी | युवा रक्षक वृत्तसेवा.
उमरी :- व्ही.पी.के. उद्योग समूहाचे चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी यांनी या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून आणि स्थानिक व्यापार, उद्योग व रोजगाराला चालना देण्यासाठी वाघळवाडा येथे ‘एम.व्ही.के. ॲग्रो फूड प्रॉडक्ट लिमिटेड’च्या चौथ्या साखर कारखान्याची उभारणी केली आहे. या ४००० टी.सी.डी. क्षमतेच्या विस्तारीकरणाचा भव्य शुभारंभ आज, गुरुवारी (दि. १५ ऑक्टोबर) सकाळी ११.०० वाजता मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.
हा शुभारंभ सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.
•प्रमुख अतिथी आणि मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून जलसंपदा मंत्री (गोदावरी-कृष्णा खोरे) राधाकृष्ण विखे पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, तसेच नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
तसेच खासदार नितीन पाटील जाधव, खासदार अजित गोपछडे, खासदार रवींद्र चव्हाण, खासदार नागेश पाटील आष्टीकर; आमदार सर्वश्री प्रताप पाटील चिखलीकर, राजेश पवार, अमरनाथ राजूरकर, तुषार राठोड, हेमंत पाटील, बालाजीराव कल्याणकर, श्रीजय चव्हाण, भीमराव केराम, आनंदराव बोढरकर, बाबूराव कोहळीकर, राजूभैया नवघरे, जितेश अंतापूरकर आदी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय माजी खासदार भास्करराव खतगावकर, बँकेच्या उपाध्यक्ष मीनलताई खतगावकर, माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी मंत्री सूर्यकांता पाटील, माधवराव पाटील किन्हाळकर, डी. पी. सावंत, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, शंकरराव धोंडगे, हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, श्यामसुंदर शिंदे, चैतन्य बापूजी देशमुख, पुनमताई पवार, रोहिदास चव्हाण, राजू घुले, सुभाष साबणे, राम पाटील रातोळीकर, भाजप जिल्हाध्यक्ष संतूकराव हंबर्डे, माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा, महापौर कविता मुळे, नरेंद्रदादा चव्हाण (भाऊराव साखर कारखाना), राजेश कुंटूरकर, माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
•प्रकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती
कार्यक्रमास साखर आयुक्त संजय कोलते, जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डिले, विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक डॉ. निलभ रोहन, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस. एल. कदम यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सोबतच डॉ. विक्रम देशमुख, संजय कुलकर्णी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब पाटील कौडगावकर, व्ही.पी. समूहाचे सीईओ संदीप पाटील कवळे, ज्ञानेश्वर पाटील सावंत, सुभाष परेवार, प्रभु पाटील पुयड आदींची उपस्थिती असेल.
•शेतकरी समृद्धी आणि रोजगारनिर्मितीचा नवा टप्पा
कवळे गुरुजी यांनी कमी वेळेत या भागातील शेतकरी अधिक सक्षम व्हावा, त्यांचा आर्थिक स्तर उंचावावा आणि या भागाचा सर्वांगीण औद्योगिक विकास व्हावा या हेतूने हा चौथा कारखाना उभारला आहे. या विस्तारीकरणामुळे नांदेड परिसरातील ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार असून, शेती प्रगतीसोबतच मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार आहे.
सहकार, उद्योग आणि शेतकरी हित यांचा सुरेख संगम साधणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यास सर्व लोकप्रतिनिधी, शेतकरी सभासद, ठेकेदार, हितचिंतक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी आणि सीईओ संदीप पाटील कवळे यांनी केले आहे.



