NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा.
नांदेड :- नांदेड येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार उजेडकर यांची पोलीस मित्र समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय उपाध्यक्ष शंकर सिंह ठाकुर यांनी ही निवड जाहीर केली आहे.
विजयकुमार उजेडकर हे शासकीय सेवेत असताना एकोणचाळीस वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले आहेत. ते सेवेत असताना सुद्धा त्यांनी अनेक पोलीस कर्मचारी यांच्या मागण्या संदर्भात लढे उभारून अनेक मागण्या मान्य करून घेतल्या आहेत.
मराठवाडा अध्यक्षपदी निवड झाल्या नंतर प्रतिक्रिया देताना उजेडकर म्हणाले की, थोड्याच दिवसात मी मराठवाड्याचा दौरा करणार असून मराठवाड्यातील सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित पोलीस मित्र समिती मध्ये प्रवेश करून घेत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष यांच्या निवडी जाहीर करणार असल्याचे सांगितले.
मा. विजयकुमार उजेडकर यांची निवड जाहीर होताच नांदेड जिल्ह्यात व मराठवाड्यात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी जल्लोष साजरा करत फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद साजरा केला. उजेडकर यांच्या या निवडीमुळे मराठवाड्यातील सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना नक्कीच वाचा फुटेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.



