19.3 C
New York
Tuesday, August 25, 2026

Buy now

spot_img
spot_img

वसमत आणि हिंगोली जिल्ह्यासाठी अभिमानास्पद! मजूर सहकारी संस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी मो. नईम मो. गौस कुरेशी यांची बिनविरोध निवड

HINGOLI | वसमत | युवा रक्षक वृत्तसेवा.

वसमत:- वसमत शहरातील कंत्राटदारांचे मार्गदर्शक आणि एक अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले मो. नईम मो. गौस कुरेशी यांची हिंगोली जिल्हा मजूर सहकारी संस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या गौरवास्पद निवडीमुळे वसमतसह संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात आनंद व अभिमानाचे वातावरण पसरले असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या निवडीबद्दल  एका विशेष सत्कार सोहळ्यात त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. आमदार राजुभैया नवघरे पाटील यांचे पिताश्री श्री. रमाकांत पाटील नवघरे आणि कंत्राटदारांचे आधारस्तंभ श्री. लक्ष्मीकांतभैया नवघरे पाटील यांच्या शुभहस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष मो. नईम मो. गौस कुरेशी यांना शाल व श्रीफळ प्रदान करून सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसंदर्भात शुभेच्छा दिल्या.

आमदार राजूभैया नवघरे यांनी व्यक्त केले मो. नईम मो. गौस कुरेशी यांच्या कार्याचे कौतुक!

वसमत येथे एका सत्कार समारंभादरम्यान आमदार राजुभैया नवघरे यांनी हिंगोली जिल्हा मजूर सहकारी संस्था फेडरेशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष मो. नईम मो. गौस कुरेशी यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला.

​यावेळी बोलताना आमदार नवघरे म्हणाले की, मो. नईम मो. गौस कुरेशी हे वसमत शहरातील कंत्राटदार आणि मजूर वर्गाचे खरे मार्गदर्शक आहेत. त्यांचे अखंड जनसंपर्क आणि सामाजिक क्षेत्रातील दांडगा अनुभव यामुळेच त्यांची ही निवड बिनविरोध झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मजूर आणि कंत्राटदारांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच, त्यांच्या या नव्या जबाबदारीमुळे सर्वसामान्य घटकांना मोठा आधार मिळेल, असे सांगत त्यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांना पुढील यशस्वी वाटचालीसंदर्भात मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

आमदार संतोषदादा बांगर यांनी दिल्या मनःपूर्वक शुभेच्छा!

हिंगोली जिल्हा मजूर सहकारी संस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी मो. नईम मो. गौस कुरेशी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हिंगोलीचे लोकप्रिय आमदार संतोषदादा बांगर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी व यशस्वी कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत अनेक मान्यवर उपस्थित होते.

या सत्कार सोहळ्याला आणि आनंदोत्सवाला परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये मोबिन दादा, लालासेठ उबारे, अजगरभाई पटेल, राजुदादा येंगडे, गौतमभाऊ वाहूळे, हरून दालवाले, वसन्तसेठ चेपुरवार, प्रमोद उबारे साहेब, शेख मजहर, मो. वसीम कुरेशी, वामन हिरवे, एन. आय. पठाण, कलीम भाई, जावेद भाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मो. नईम मो. गौस कुरेशी यांच्या या महत्त्वपूर्ण नियुक्तीमुळे मजूर व कंत्राटदारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी एक सक्षम व अनुभवी नेतृत्व मिळाले असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

 

Related Articles

ताज्या बातम्या