NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा.
नांदेड :- नांदेड विमानतळावर महाराष्ट्र राज्य युवा सेनेचे नेते तथा खासदार मा. श्रीकांत शिंदे आणि महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष तथा पाथरी विधान परिषदेचे आमदार मा. सईद भैया खान यांचे शिवसेना अल्पसंख्यांक विभाग नांदेड यांच्या वतीने अत्यंत उत्साहात आणि दणक्यात स्वागत करण्यात आले.
या स्वागत सोहळ्याप्रसंगी नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार मा. बालाजी कल्याणकर, अल्पसंख्यांक विभाग नांदेड जिल्हा प्रमुख मा. अनवर अहमद, शहर प्रमुख शेख फारूक, नांदेड उत्तर युवा शहर प्रमुख साजिद खान, जिल्हा सचिव शेख फरीद, तसेच जुबेर अहमद, शेख एहतेशाम, शेख आखिब, शेख तौखीर, शेख बाबा आदी मान्यवर नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रमुख नेत्यांच्या आगमनामुळे उपस्थित शिवसैनिकांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.



