NANDED | धर्माबाद | युवा रक्षक वृत्तसेवा.
धर्माबाद:- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. धर्माबाद तालुक्यातील सिरजखोड पुलावर गोदावरीचे अंदाजे सहा फुटांपेक्षा अधिक पाणी आले असून, पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. यामुळे धर्माबाद-मनूर-बामणी-संगम-विळेगाव या प्रमुख मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे पोलीस प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धर्माबाद चे पोलीस निरीक्षक सदाशिव भडिकर यांनी एक जाहीर आवाहन करत, नागरिकांना या मार्गावरून प्रवास टाळण्यास सांगितले आहे. तसेच, गणेश विसर्जन साठी गणेश भक्तांना गोदावरी नदीकाठी जाणे टाळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
या संकटाच्या काळात नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.