PUNE | पुणे | युवा रक्षक वृत्तसेवा.
पुणे:- महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या ‘मुंबईच्या वारी’ आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैय्या नवघरे यांनी पुढाकार घेतला आहे. ‘राजूभैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठान’च्या वतीने मराठा आंदोलनात सहभागी होणाऱ्या बांधवांसाठी पाणी, नाश्ता आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे.
‘मोहिम मुंबईची वारी आरक्षणाच्या दारी!’ या शीर्षकाखाली हे आंदोलन सुरू आहे. आ. चंद्रकांत नवघरे यांनी आंदोलकांचे स्वागत करून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. ही मदत पुणे-चाकण-तळेगाव रस्त्यावरील खराडी फाटा, खराडी येथील ‘हॉटेल महाराजा’ येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.