11.4 C
New York
Thursday, October 9, 2025

Buy now

spot_img
spot_img

नांदेड पोलीस स्था.गु.शा. धडाकेबाज कारवाई: चोरीच्या ०३ दुचाकीसह; एकूण १ लाख ४४ हजार ५०० रू मुद्देमाल जप्त.

NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा

नांदेड:- नांदेड शहरात मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नांदेड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीच्या तीन मोटारसायकली आणि रोख ९५०० रुपये असा एकूण १,४४,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेला एका गुप्त सूत्राकडून माहिती मिळाली होती की, काही आरोपी चोरीच्या मोटारसायकली विकण्यासाठी शहरात येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपींना रंगेहाथ पकडले. या कारवाईत ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये शेख शौकत शेख शब्बीर, बालाजी पेंटाजी रामुलवार हे आरोपी आहेत. आरोपींकडून विचारपूस केली असता मोटरसायकल ही बाबानगर नांदेड, इतवारा व भोकर येथून प्रत्येकी एक मोटर सायकल चोरी केल्याचे आरोपीने सांगितले आहे. तसेच पोलीस स्टेशन वजीराबाद हद्दीतील बस स्थानक येथे प्रवाशांच्या खिशातून नगदी ९५०० रुपये ची चोरी केल्याची सांगितले व अभिलेखाची पाहणी केली असता पोलीस स्टेशन शिवाजीनगर, भोकर , इतवारा व वजीराबाद येथे चार गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यावरून सदर आरोपीस ताब्यात घेऊन ०३ मोटारसायकली व नगदी ९५०० रुपये एकूण किंमत १,४४,५०० असे हस्तगत करण्यात आल्या आहेत. ही कामगिरी नांदेड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. उदय खंडेराय आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, पोलीस अंमलदार दारासिंग राठोड, मोहन हक्के, सुनिल गटलेवाड, मिलिंद नरबाग, रितेश कुलथे, अमोल घेवारे, सर्व स्थानिक गुन्हा शाखा नांदेड व सायबर सेल येथील अंमलदार राजू सिटीकर, दीपक ओढणे यांचा समावेश होता.

या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत झाली असून, पोलीस दलाच्या या तत्परतेचे नागरिकांनी कौतुक केले आहे. पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी या कामगिरीबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे अभिनंदन केले आहे. तसेच, नागरिकांना कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

 

Related Articles

ताज्या बातम्या