NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा.
नांदेड :- जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंस्टाग्रामवर प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडिओची दखल घेत त्वरित कारवाई केली. या व्हिडिओमध्ये एका महिलेला त्रास दिला जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून आरोपीला 24 तासांच्या आत अटक केली.
ही कारवाई महिला सुरक्षेसाठी एक महत्त्वाचा संदेश आहे. पोलीस सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहेत आणि महिलांवरील अत्याचारांना गंभीरपणे घेत आहेत. नांदेड चे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यामध्ये मिशन निर्भया राबविण्यात येत आहे. या मिशन निर्भया अंतर्गत महिला सुरक्षेसाठी नांदेड पोलीस तत्पर आहेत.
पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलीकर यांनी महिलांना आवाहन केले आहे की, जर त्यांना कोणी त्रास देत असेल, तर त्यांनी तात्काळ 112 क्रमांकावर संपर्क साधावा.