NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा.
नांदेड : नांदेडमधील देगलूर नाका चौकातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात वंचित बहुजन आघाडीने ‘मौत का कुआ’ (मृत्यूचा विहीर) गांधीगिरी आंदोलन आयोजित केले आहे.
या आंदोलनात वाहन चालकांना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाची जाणीव करून देण्यासाठी त्यांच्यावर फुलांची उधळण करून ‘गांधीगिरी’ पद्धतीने निषेध व्यक्त केला जाणार आहे. हे आंदोलन २० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २:३० वाजता होणार आहे.असे वंचित बहुजन आघाडी ने एका प्रसिद्ध केलेल्या पत्रामध्ये सोशल मीडिया द्वारे दिलेले आहे.