6.5 C
New York
Thursday, April 17, 2025

Buy now

spot_img
spot_img

सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस सी.ओ. पी. ची सनद ॲड. गोपालरेड्डी यांना बार कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या कडून मिळाले.

NANDED | धर्माबाद | युवा रक्षक वृत्तसेवा.

धर्माबाद ( प्रतिनिधी ) :- भारतात वकील होण्यासाठी आणि कायद्याचा अभ्यास करण्यासाठी केवळ कायद्याची पदवी पुरेशी नाही. एल.एल.बी सारखा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवाराला ऑल इंडिया बार कौन्सिल सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस सी.ओ. पी.  परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. जे विद्यार्थी सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस सी.ओ. पी. परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना कायद्याचा सराव करण्याचा परवाना अधिकृत रित्या मिळतो.

ऑल इंडिया बार कौन्सिल यांच्या वतीने सन २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत ॲड. गोपाळरेड्डी कोनरेड्डी कोटावार यलम यांनी या परीक्षेत सहभाग घेत बार कौन्सिल ऑफ इंडियाची सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस सी.ओ. पी. परीक्षा पास झाल्यामुळे सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस सी.ओ. पी. ची सनद प्रमाणपत्र मन्नान कुमार मिश्रा चेअरमन ऑफ बार कौन्सिल ऑफ इंडिया, आशिष पंजाबराव देशमुख मेंबर ऑफ बार कौन्सिल, पारिजात एम. पांडे चेअरमन ऑफ महाराष्ट्र, श्रीमंत सेन सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र ॲड गोवा बार कौन्सिल मुंबई यांच्या वतीने सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस सी.ओ. पी.ची सनद देण्यात आली आहे. ॲड. गोपाळरेड्डी यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव यावेळी होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या