NANDED | युवा रक्षक वृत्तसेवा
नांदेड(प्रतिनिधी):- समाजात जातीय अगर धार्मिक तेढ निर्माण होणाऱ्या पोस्ट किंवा कॉमेंट सोशल मीडियावर पोस्ट करू नये अथवा स्टेटस वगैरे ठेऊ नयेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व खोट्या अफवा पसरवू नये. असे नांदेड जिल्हा पोलीस दलामार्फत जाहिर आवाहन करण्यात आले आहे.
पोलिसांतर्फे अशा पोस्टवर लक्ष ठेवण्यात येत असून संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, जिल्ह्यामध्ये सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सहकार्य करावे.असे नांदेड पोलिसांकडून देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
-: संपर्क :-
आपत्कालीन परिस्थितीमध्ये डायल करा – ११२
पोलीस नियंत्रण कक्ष नांदेड – ०२४६२-२३४७२०