-3.6 C
New York
Tuesday, January 20, 2026

Buy now

spot_img
spot_img

धर्माबाद नगर परिषद निवडणूक: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ‘एकला चलो रे’! नगराध्यक्षपदासह सर्व जागा स्वबळावर लढणार – गणेश गिरी.

NANDED | धर्माबाद | युवा रक्षक वृत्तसेवा.

धर्माबाद :- धर्माबाद नगर परिषद निवडणुकीत एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ही निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. नगर परिषद निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत युती न करता, उद्धव ठाकरे गट नगराध्यक्ष  आणि सर्व नगरसेवक  पदांसाठी आपले उमेदवार उभे करणार आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयाची सविस्तर माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नांदेड उपजिल्हाप्रमुख गणेश गिरी महाराज यांनी ‘युवा रक्षक’चे संपादक यांना दूरध्वनीद्वारे  माहिती दिली आहे

धर्माबाद नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस  १७ नोव्हेंबर २०२५  आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, ज्यामुळे धर्माबादच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

📜 उमेदवारांची अंतिम यादी उद्या होणार जाहीर!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उद्या, १७ तारखेला नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठीच्या अंतिम उमेदवारांची यादी  अधिकृतपणे जाहीर करणार आहे.

धर्माबादचा पुढील नगराध्यक्ष कोण असणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्व प्रभागांतील सक्षम आणि स्थानिक मुद्द्यांवर आवाज उठवणाऱ्या उमेदवारांची नावे उद्या अधिकृतपणे घोषित केली जातील.

या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने धर्माबाद नगर परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. उद्या जाहीर होणाऱ्या अंतिम यादीकडे आता धर्माबादकरांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या