” वर्गाला शिकविणाऱ्या गुरुजनांचा केला सन्मान “
NANDED | धर्माबाद | युवा रक्षक वृत्तसेवा.
धर्माबाद :- येथील सुप्रसिद्ध हु.पानसरे हायस्कूल येथील दहावी क वर्गातील 2009 च्या विद्यार्थ्यांनी, सोळा वर्षानंतर स्नेह संमेलन सोहळा अत्यंत उत्साहाने संपन्न केलाआहे. या सोहळ्यात दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या गुरुजनांचा शाल, पुष्पहार व भेटवस्तू देऊन सन्मान करून ऋण व्यक्त केले आहे. सत्कार स्वीकारताना गुरुजन भारावून गेले होते.
शुभम इनानी, आकाश पेकमवार सावकार, अनुप रेड्डी, आकाश रेड्डी, देविदास काळे, लक्ष्मीकांत वाकोडे स्नेह संमेलनाचे नियोजन करून विखुरलेल्या सर्व मित्रांना गेट-टुगेदर साठी बोलाविले, दि. पाच ऑक्टोबर रोजी गेट-टुगेदर चे आयोजन केले आहे,
सकाळच्या सत्रात आपली हु. पानसरे हायस्कूल येथे जाऊन हु.पानसरेच यांच्या मूर्तीला पुष्पहार टाकून वंदन करण्यात आले आहे. नंतर दहावी क च्या वर्गात जाऊन लहानपणाच्या बाकावर बसून आठवणी व सर्व गोष्टींना उजाळा दिला आहे. संस्थेचे सचिव विश्वनाथराव पाटील बन्नाळीकर यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना हु. पानसरे चे चित्र असलेले मोमेंटो देऊन स्वागत केले आहे. शाळेच्या मैदानावर जाऊन दररोजची प्रार्थना, परिपाठ, होत असलेल्या खेळाच्या स्पर्धा, एनसीसी परेड यांची आठवण खेळीमेळीच्या वातावरणात करण्यात आली व आनंद लुटला.
दुसऱ्या सत्रात बन्नाळी रोडवरील ईनानी मंगल कार्यालयात दहावी क या वर्गाला शिकविणाऱ्या शिक्षकांचा शाल, पुष्पहार व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला आहे. या प्रेमळ व सह्रदय सत्काराने शिक्षक भारावून गेले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मु. अ. डी. डी. कुलकर्णी हे होते.
यावेळी दहावी क वर्गास विज्ञान शिकविणारे सेवानिवृत्त मु.अ. सूर्यकांत देबडवार, शंकरराव सोनटक्के, इतिहास शिकविणारे तथा माजी एनसीसी ऑफिसर जी.पी.मिसाळे, वर्गशिक्षक एन. जी. मोरे, लक्ष्मण कात्रे, पर्यवेक्षक मोहन पुलकंठवार, मराठी विषय उदय सोवळे, एनसीसी ऑफिसर संदीप नलवार, अकाउंटंट ओम पालकृतवार, यांची उपस्थिती होती.
यावेळी शुभम ईनानी, नवीन गुजलवार व विद्या बल्ला यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले व भावी जीवनाविषयी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष डी. डी.कुलकर्णी यांनी आपले सविस्तर मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
वर्गमित्र संतोष बुन्नोड, महेंद्र रेड्डी, विजय मिरदोडे, सुधाकर दारमोड, धम्मानंद मिसाळे, लक्ष्मीकांत वाकोडे, सचिन तुरे, सब विद्या बल्ला, सोनाली गुडगुलवाड, पूजा कोदळे, प्रियंका एडके, अविनाश शेपूरे, साईनाथ बिंदगे, आकाश गायकवाड यांच्यासह सर्व वर्गमित्र – मैत्रिणी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. सूत्रसंचालन प्रा. डॉ.बालाजी श्रीगिरे तर आभार मारोती काळे यांनी मानले. सुरुची भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.



