NANDED | धर्माबाद | युवा रक्षक वृत्तसेवा.
धर्माबाद :- सध्या सायबर गुन्हेगार ‘SBI KYC अपडेट’च्या नावाखाली WhatsApp वर मेसेज पाठवून नागरिकांची फसवणूक करत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. या धोक्यापासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन धर्माबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांनी केले आहे.
पोलीस निरीक्षक भडीकर यांनी सर्व ग्रुप सदस्य आणि ग्रुप ॲडमिन यांना विशेष सूचना देत हे आवाहन केले आहे. या फसवणुकीच्या प्रकारात, नागरिकांना SBI KYC अपडेट करण्यासंबंधी मेसेज येतो आणि त्यासोबत एक APK फाईल (ॲप डाउनलोड लिंक) WhatsApp वर पाठवली जाते.
पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांनी दिलेला इशारा:
- अनोळखी लिंकवर क्लिक करू नका: नागरिकांनी अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये किंवा ती APK फाईल उघडू नये.
- गोपनीय माहिती शेअर करू नका: बँक संबंधित कोणतीही माहिती, जसे की ATM पिन, OTP, CVV क्रमांक किंवा पासवर्ड अनोळखी व्यक्तीसोबत किंवा मेसेजवर शेअर करू नका.
- बँकेचे व्यवहार फक्त बँकेत करा: बँक संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम, जसे की KYC अपडेट, हे प्रत्यक्ष बँकेत जाऊनच करावे.
- सावधगिरी बाळगा: अगदी तुमच्या जवळच्या मित्राकडूनही अशी लिंक आली तरी ती ओपन करू नका. एकदा लिंक ओपन केली की ती आपोआप तुमच्या ग्रुपवर शेअर होण्याची शक्यता असते.
सायबर गुन्हे टाळण्यासाठी वेळेत खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी जागरूक राहून आणि वेळीच खबरदारी घेऊन सायबर फसवणुकीचे बळी होणे टाळावे व सावध रहा, सुरक्षित रहा असे आवाहन पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांनी केले आहे.