NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा.
नांदेड:- नांदेड-वाघाळा महानगरपालिका कर्मचारी पतसंस्था मर्यादित नांदेड, चे वरिष्ठ लिपिक आनंद सरोदे यांचा वाढदिवस महानगरपालिका कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक सहकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
कार्यालयीन सहकाऱ्यांकडून सत्कार
आनंद सरोदे यांच्या कामाप्रतीची निष्ठा आणि मनमिळावू स्वभावामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष आयोजन केले होते. याप्रसंगी त्यांना शॉल व आकर्षक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यांची होती विशेष उपस्थिती.
यावेळी महानगरपालिकेचे कर्मचारी गणेश नागरगोजे, प्रदीप फुलारी, विशाल सोनकांबळे, अभिजीत हिवरे, नरसिंग अण्णा, सुनील गायकवाड, ओमप्रकाश पिटलोड, राजेश जोंधळे, धीरण आठवले आदी उपस्थित होते. तसेच, ‘साप्ता.युवा रक्षक’ वृत्तपत्राचे संपादक मोहम्मद नाहिद अ. समी यांनीही आवर्जून उपस्थित राहून आनंद सरोदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.उपस्थित मान्यवरांनी आनंद सरोदे यांच्या पुढील आयुष्यासाठी आरोग्य व सुख-समृद्धीची कामना केली.