18.1 C
New York
Wednesday, October 8, 2025

Buy now

spot_img
spot_img

नांदेड शहरात पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन चे  माजी महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद मोईन यांच्याकडून अन्नधान्य किट चे वाटप…..

NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा.

नांदेड:- शहरात आलेल्या अतिवृष्टी मुळे शहरात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती, या पुरग्रस्तामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत नांदेड ऑल इंडिया  मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन मदतीसाठी पुढे येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन चे  माजी महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद मोईन यांनी पूरग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे.

वाघी रोडवरील अबरार फंक्शन हॉलमध्ये सय्यद मोईन यांच्या वतीने पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. यावेळी बोलताना सय्यद मोईन म्हणाले, “अशा संकटाच्या काळात आपण सर्वांनी एकत्र येऊन गरजूंना मदत करणे गरजेचे आहे. ही मदत म्हणजे एक सामाजिक बांधिलकी आहे.”

या कार्यक्रमाला मुफ्ती अय्यूब कासमी सहाब , पोलीस निरीक्षक वजीराबाद कदम सर , मिर्झा अमजद बेग , शेख सैफ अली (सोनू भाई), शहबाज खान, अलीम चाऊस, हुसैन पहेलवान, नासेर खान यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्वांनी सय्यद मोईन यांच्या कार्याचे कौतुक केले.

“ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन चे  माजी महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद मोईन नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांची ही मदत पूरग्रस्त कुटुंबांना मोठा आधार देणारी आहे,” असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

 

Related Articles

ताज्या बातम्या