NANDED | धर्माबाद | युवा रक्षक वृत्तसेवा.
धर्माबाद:- ईद ए मिलादुन्नबीच्या पवित्र प्रसंगी धर्माबाद शहरात समस्त मुस्लिम समाजातर्फे एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या १५०० व्या जयंतीचे औचित्य साधून, शुक्रवारी, ५ सप्टेंबर २०२५ रोजी शुक्रवार सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे.
पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे केवळ एका समाजाचे नसून, ते सर्वांसाठी आहेत, हा संदेश देत धर्माबाद येथील मुस्लिम समाजाने अशा मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या शिबिरात रक्तदान करू इच्छिणाऱ्यांसाठी नावनोंदणीची सोय उपलब्ध आहे. नाव नोंदणीसाठी सामाजिक कार्यकर्ते नविद अहमद, सय्यद इलियास (पत्रकार), मोहम्मद खान, मिन्हाज पटेल, इज्जू भाई, मुबशीर (पत्रकार), शेख कलीम आणि सुलतान यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरामुळे समाजात सलोखा आणि एकतेचा संदेश जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.