MUMBAI | मुंबई | युवा रक्षक वृत्तसेवा.
मुंबई, ३१ ऑगस्ट २०२५ :- मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वसमत मतदारसंघाचे आमदार राजुभैय्या नवघरे यांनी आज आझाद मैदानावर जाऊन त्यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान, आमदार नवघरे यांनी जरांगे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांच्या संघर्षाला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या या लढ्यात आपण त्यांच्यासोबत असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या भेटीमुळे आंदोलकांना मोठा आधार मिळाला असून, उपोषणस्थळी उत्साहाचे वातावरण आहे.