NANDED | धर्माबाद | युवा रक्षक वृत्तसेवा.
धर्माबाद, ३१ ऑगस्ट :- धर्माबाद तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख गणेश गिरी यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त करत १ सप्टेंबर रोजीचा आपला वाढदिवस रद्द केला आहे. तालुक्यात सध्या पूरस्थिती गंभीर आहे आणि शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत. त्यामुळे वाढदिवसाचा कोणताही कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय गिरी यांनी घेतला आहे.
“आज शेतकरी राजा दुःखात आहे, अशा परिस्थितीत आनंद साजरा करणे योग्य नाही,” असे गिरी यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे. त्यांनी मित्र, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना वाढदिवसानिमित्त हार, शाल किंवा सत्कार न करण्याची विनंती केली आहे. गिरी यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.