NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा.
नांदेड (२९ ऑगस्ट, २०२५) – नांदेड जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आज, शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०२५ रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी म्हटले आहे की, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. पालकांनी आणि नागरिकांनी मुलांना घराबाहेर पाठवू नये. तसेच, नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. या काळात नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
युवा रक्षक चे संपादक यांनी नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना दूरध्वनीद्वारे संपर्क केला असता, मा. जिल्हाधिकारी यांनी अशी माहिती दिली आहे.