NANDED | उमरी | युवा रक्षक वृत्तसेवा.
उमरी:- आज, २८ ऑगस्ट रोजी उमरी शहरात श्री कैलासभाऊ गोरठेकर मित्र मंडळा तर्फे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी लोकप्रिय परफॉर्मर हिंदवी पाटील येणार आहेत.
स्थानिक ‘गोरठेकर कॉम्प्लेक्स, मौढा मैदान, उमरी’ येथे संध्याकाळी ६ वाजता हा उत्सव सुरू होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन श्री कैलासभाऊ गोरठेकर मित्र मंडळाने केले आहे.
दहीहंडी उत्सवाच्या या खास प्रसंगी संगीत, नृत्य आणि जल्लोषाचा अनोखा संगम पाहायला मिळेल. या उत्सवात सहभागी होऊन या विशेष मेळाव्याचा अनुभव घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.