NANDED | उमरी | युवा रक्षक वृत्तसेवा.
उमरी:- आज संपूर्ण महाराष्ट्रात गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) उत्साह पाहायला मिळत आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. उमरी येथील लोककल्याणकारी शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी यांच्या ‘श्रमसाफल्य निवासस्थानी’ देखील बाप्पा विराजमान झाले आहेत.
यावेळी मारोतराव कवळे गुरुजी यांनी राज्यातील जनतेला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. “आज, अवघ्या विश्वाचे विघ्नहर्ता, श्री गणेशाचं घरोघरी आगमन होत आहे. या औत्सुक्यानं इडा- पीडा टळो आणि सर्वांना सुख, यश-समृद्धीपूर्ण जीवन प्राप्त होवो, हीच गणराया चरणी मनस्वी प्रार्थना!” असे ते म्हणाले.