NANDED | उमरी | युवा रक्षक वृत्तसेवा.
इळेगाव (ता. उमरी) – येथील कवळे कुटुंबातील तरुण सदस्य कैलास कवळे, पांडुरंग कवळे आणि अक्षय कवळे यांनी आपल्या मेहनतीवर आणि चिकाटीच्या बळावर दोन नवीन ‘भारत ब्रँच’ हायवा गाड्या खरेदी केल्या आहेत. या गाड्यांचे लोकार्पण सोहळा लोककल्याणकारी शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आला.
इळेगाव येथे झालेल्या या कार्यक्रमात, कवळे गुरुजींच्या हस्ते गाड्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ मंडळी व मान्यवर उपस्थित होते, ज्यात प्रभाकर पाटील पुयड, आनंदराव पाटील भायेगावकर, तिरुपती पाटील कौदगावकर, गोविंद पाटील ढगे, पिंटू पाटील बळेगावकर आणि प्रभाकर सांगे यांचा समावेश होता. या प्रसंगी इळेगाव गावातील सर्व मित्रपरिवार आणि स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कवळे कुटुंबातील या तीन तरुणांनी दाखवलेली जिद्द आणि यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे आणि कौतुकाचे वातावरण आहे. त्यांच्या या यशाने गावातील इतर तरुणांनाही प्रेरणा मिळाली आहे.