NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा
नांदेड:- नांदेड जिल्हा पोलिसांच्या वतीने फिट इंडिया अभियानांतर्गत ‘नांदेड जिल्हा पोलीस फिट इंडिया व सामाजिक सलोखा भव्य सायक्लोथॉन’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही सायक्लोथॉन उद्या, रविवार, २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ६:३० वाजता पोलीस कवायत मैदान, नांदेड येथे सुरू होईल.
पोलीस अधीक्षक मा.श्री.अबिनाश कुमार (I.P.S.) यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश फिटनेसची आवड निर्माण करण्यासोबतच समाजात सलोखा वाढवणे हा आहे.
सायक्लोथॉनचा मार्ग:
१० किलोमीटरच्या या सायक्लोथॉनचा मार्ग पोलीस मुख्यालय येथून सुरू होऊन तिरंगा चौक, वजीराबाद चौक , कला मंदिर , शिवाजी नगर, आयटीआय, श्रीनगर, वर्कशॉप, भाग्यनगर, आनंदनगर, वसंतराव नाईक टी पॉईंट, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली गेट ओव्हर ब्रिज, चिखलवाडी, महावीर चौक, वजीराबाद चौक, तिरंगा चौक मार्गे पुन्हा पोलीस मुख्यालयात समाप्त होईल.
या सायक्लोथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन फिटनेस आणि सामाजिक एकतेचा संदेश द्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.या सायक्लोथॉन चे आयोजक मा. श्री.अबिनाश कुमार (I.P.S.) पोलीस अधीक्षक नांदेड, व विनीत श्री. सूरज गुरव (म.पो.से.) अपर पोलिस अधीक्षक नांदेड, श्रीमती अर्चना पाटील (म.पो.से.) अपर पोलिस अधीक्षक भोकर, श्री.रामेश्वर वेंजने पोलीस उप-विभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर, श्रीमती डॉक्टर अश्विनी जगताप (म.पो. से.) पोलीस उप-अधीक्षक गृह नांदेड.