Nanded | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा.
नांदेड:- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिके तर्फे आज दि.२३ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता मुख्य प्रशासकीय इमारत स्थायी सभागृह कक्ष पहिला माळा येथे “लोकमान्य बाळ गंगाधर टिळक” यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस नांदेड मनपा अतिरिक्त आयुक्त गिरिश कदम यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपआयुक्त सुप्रिया टवलारे, नितीन गाडवे, स.अजितपालसिंग संधु, सहाय्यक संचालक नगररचनाकार पवन आलुरकर, वैद्यकीय आधिकारी डॉ.हनुमंत रिठ्ठे, स्विय सहाय्यक महेश आसने यांच्यासह मनपाचे कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.