“नुसरत कन्स्ट्रक्शन चे मालक मोईज सेठ यांच्या कडून गुणवंत विद्यार्थिनी साठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात आले व त्यांनी स्कॉलरशिप मध्ये निवड झालेल्या विद्यार्थिनीचे सत्कार व त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिले..”
NANDED | धर्माबाद | युवा रक्षक वृत्तसेवा.
धर्माबाद :- जिल्हा परिषद हायस्कूल, करखेली येथे “नुसरत कन्स्ट्रक्शन्स स्कॉलरशिप निवड चाचणी” शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी नुकतीच पार पडली. या चाचणीत मराठी माध्यमात गायत्री गजानन खांडरे हिने प्रथम क्रमांक मिळवून बाजी मारली, तर राखी रमेश भोगेवार हीने द्वितीय क्रमांक पटकावला. उर्दू माध्यमातून तजामहेरीन उस्मान कुरेशी ही विद्यार्थिनी प्रथम क्रमांकाने यशस्वी झाली.
या गुणवंत विद्यार्थिनींचा विशेष सत्कार “नुसरत कन्स्ट्रक्शन्स”चे मालक श्री. मोईजोद्दीन सेठ यांच्या हस्ते गावकरी व शाळा प्रशासनाच्या उपस्थितीत करण्यात आला. सत्कारप्रसंगी विद्यार्थिनींना पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपस्थितांनी विद्यार्थिनींचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तीन लाख रुपये प्रति विद्यार्थी – शिष्यवृत्तीचे स्वरूप
“नुसरत कन्स्ट्रक्शन्स”तर्फे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी व बारावी शैक्षणिक वर्गासाठी फी, शहरात निवास व जेवणाचा संपूर्ण खर्च दिला जाणार असून, एकूण अंदाजे प्रति विद्यार्थ्याचा वार्षिक खर्च ३ लाख रुपये आहे. ही योजना फक्त शैक्षणिक वर्ष २०२४-२५, २०२५-२६ व २०२६-२७ साठी लागू असून, जिल्हा परिषद हायस्कूल, करखेली येथे इयत्ता दहावीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठीच आरक्षित आहे.
शाळेचे आवाहन – उज्ज्वल भविष्याच्या दिशेने पाऊल टाका.
या अद्वितीय संधीचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद हायस्कूल, करखेली येथे प्रवेश घ्यावा, असे आवाहन शाळा प्रशासनाने केले आहे. प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्यावतीने हार्दिक स्वागत करण्यात आले.