NANDED | धर्माबाद | युवा रक्षक वृत्तसेवा.
धर्माबाद (प्रतिनिधी) :- अगदी कमी वयात विविध व्यवसायात अतिशय यशस्वी झेप घेत सामाजिक कार्याचा वसा हाती घेत व तो अगदी मनापासून निभावणारे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण तद्वतच विद्यामान आमदार राजेश पवार, माजी आमदार अमर भाऊ राजूरकर यांचे विश्वासू माजी नगरसेवक प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ते शंकर अण्णा बोल्लमवाड यांच्यातर्फे उद्या होणाऱ्या ईद निमित्त गरीब कुटुंबातील मुस्लिम बांधवांची ईद गोड व्हावी यासाठी गोरगरीब मुस्लिम कुटुंबीयांना अगदी सर्वंकष किटचे वाटप त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले.
सामाजिक ऐक्य त्याचबरोबर हिंदू व मुस्लिम धर्मीयांमध्ये सुसंवाद साधत राष्ट्रीय एकात्मता प्रखर व्हावी हा मूळ उद्देश उराशी बाळगून शंकर अण्णा बोल्लमवाड यांनी रमजान ईद म्हणजेच ‘ईद-उल-फित्र’या मुस्लिम धर्मीयांच्या अतिशय पवित्र सणानिमित्त ईद गोड व्हावी यासाठी जेवढे साहित्य एका कुटुंबीयांसाठी लागते.
त्यामध्ये सुकामेवा, शेवया,तांदूळ, तेल, तूप, डाळी, अत्तर आदी सर्वंकष किटचे वाटप केले. त्याचबरोबर ८०० टन फळे रोजा धरणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या घरपोच पोहोचते केले. यावेळी स्वतः शंकर अण्णा बोल्लमवाड, भाजपाचे तालुका अध्यक्ष विजय डांगे, ज्येष्ठ पत्रकार तथा माजी नगरसेवक कृष्णा तीम्मापुरे, संजय पवार, संजय कदम, राजू सुरकुटवार, सामाजिक कार्यकर्ते नवीद अहमद, शेख माजिद, गुलाबराव पाटील बाभूळगावकर, अजिज पिंजारी, मुस्लिम धर्मगुरू लतीफ बाबा, मुस्लिम धर्मियांचे ज्येष्ठ तथा धर्माबाद मधील सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व एस. के. मामा, सामाजिक कार्यकर्ते ताहेर पठाण, काशिनाथ उशलवार,नगरसेवक प्रतिनिधी श्रीदास वाघमारे, प्राध्यापक सुधाकर वाघमारे कांगठीकर, पत्रकार गजानन कुरुंदे, बालाजी अरेवार, सतीश उशलवार,विजय पाटील वारले, सिनू गुर्जलवाड, लक्ष्मीकांत बाजनवाढ,माजित खान, संजू पेरकावाड यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. शंकर अण्णा बोल्लमवाड यांच्या उपरोक्त स्तुत्य उपक्रमाचे धर्माबाद शहरात कौतुक होत आहे.