NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा.
नांदेड: समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष हैदर पटेल यांची आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्या नेतृत्वात, राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या हस्ते नरसी येथे प्रवेश करण्यात आला आहे.
हैदर पटेल हे नांदेड जिल्ह्यामधले एक युवा नेतृत्व असून त्यांचे समाजकारण खूप चांगल्या प्रकारे लोकांमध्ये पोहोचले आहे. अल्पसंख्याक समाजामध्ये त्यांची एक चांगली छवी तयार झालेली, असे दिसून येत आहे. हैदर पटेल हे समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष होते, परंतु त्यांनी अल्पसंख्याक समाजासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) मध्ये नुकताच त्यांनी प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत भव्य संख्येने कार्यकर्ता यांनी प्रवेश केले आहे . यावेळी आजी-माजी मंत्री पदाधिकारी व सर्व कार्यकर्ता उपस्थित होते.