NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील कंधार लोहा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाचे आमदार मा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांची महाराष्ट्र विधिमंडळाच्या उपविधान समितीच्या प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांच्या ज्येष्ठ कार्यकर्ताकडून नांदेड रेल्वे स्टेशन येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी नांदेड चे माजी नगरसेवक मो. साबेर चाऊस, माजी नगरसेवक हबीब मौलाना, शकील कुरेशी, अब्दुल खय्यूम बागवान व सर्व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.