NANDED | धर्माबाद | युवा रक्षक वृत्तसेवा.
धर्माबाद (प्रतिनिधी):- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष व मित्र परिवाराच्या वतीने भव्य अशा आमदार चषक-२०२५ टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन बाजार समिती मैदान (जुनी जिनिंग) सायखेड फाटा येथे करण्यात आले असून, सदरील सामन्याचा भाग्य शुभारंभ १९ फेब्रुवारी रोजी आमदार राजेश पवार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.पुनमताई पवार यांच्या हस्ते होणार आहे.
आमदार राजेश पवार यांनी क्रीडा क्षेत्रात सर्व विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी अनेक स्पर्धेचे आयोजन पूर्वीही केले होते. त्या धरतीवरच व त्यांच्या विचारांना भारावून यांची परंपरा पुढे चालवण्यासाठी सदरील सामन्याचे मुख्य आयोजक भाजपा तालुका अध्यक्ष विजय पाटील डांगे यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या तर्फे प्रथम पारितोषिक ५५,५५५ ठेवण्यात आले असून, द्वितीय पारितोषिक गुलाब पाटील मोरे यांच्यातर्फे २२,२२२ रुपये ठेवण्यात आले आहे.तर तृतीय पारितोषिक हे संतोष पाटील मोरे यांच्याकडून ११,१११ रुपयाचे ठेवण्यात आले असून प्रोत्साहन पर अनेक बक्षीसांची उधळण करण्यात येणार आहे. उपरोक्त नियम व अटीच्या अधीन राहून जे संघ भाग घेऊ इच्छितात अशांनी आयोजक विजय पाटील डांगे, गुलाबराव पाटील मोरे, संतोष पाटील मोरे, सुधाकर कदम, विठ्ठल इबितवार यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन विजय पाटील डांगे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.