NANDED | कुंडलवाडी | युवा रक्षक वृत्तसेवा.
कुंडलवाडी (प्रतिनिधी):- येथील कै.गंगाधर चिनन्ना दरबस्तेवार व कै.रमाबाई गंगाधरराव दरबस्तेवार यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा तालुकास्तरिय आदर्श शिक्षक व तालुकास्तरिय आदर्श पत्रकार पुरस्कार- 2025 घोषणा करण्यात आली असुन यात दैनिक पुण्यनगरी चे बडूर येथील प्रतिनिधी भीमराव बडूरकर यांना आदर्श पत्रकार तर बिलोलीच्या साने गुरुजी विद्यालयातील शिक्षक शंकर कुरणापल्ले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित झाला आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळ्यात कुंडलवाडीचे भुमीपुत्र तथा म.गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा येथील नामवंत वक्ते प्रा.डाॅ.बालाजी चिरडे यांची उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कुणाल लोहगावकर, पानसरे महाविद्यालयाचे उपाध्यक्ष राजेश्वर उत्तरवार,सामाजिक कार्यकरते तथा प्रतिष्ठित व्यापारी साईनाथ उत्तरवार, सर्वोदय छात्रालयाचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष अशोक कांबळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी जी.बी बिरमवार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे.दि.8 फेबुवारी सायंकाळी पाच वाजता व्यंकटेश्वर मंदिर, नरागल्ली येथे हा कार्यक्रम पार पडणार असुन मोठ्या संख्येने शिक्षक,पत्रकार व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक तथा शिक्षक व पत्रकार सुभाष दरबस्तेवार यांनी केले आहे.
.