11.1 C
New York
Monday, April 7, 2025

Buy now

spot_img
spot_img

नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ; अभिजीत राऊत सहआयुक्त जीएसटी 

NANDED | युवा रक्षक वृत्तसेवा

नांदेड : सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले यांची नांदेडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची छत्रपती संभाजी नगर येथे वस्तू व सेवा कर सहआयुक्त पदावर बदली झाली आहे.

मंगळवारी सायंकाळी सामान्य प्रशासन विभागाने सनदी अधिकाऱ्यांच्या बदली जाहीर केल्या. यामध्ये सन 2015 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असणारे राहुल कर्डिले यांची नांदेड जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. त्यांनी यापूर्वी अमरावती सहाय्यक जिल्हाधिकारी ,परभणी सहाय्यक जिल्हाधिकारी, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,वर्धा जिल्हाधिकारी आणि सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आदी विविध पदे भूषविली आहेत.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची सह आयुक्त वस्तू व सेवा कर छत्रपती संभाजी नगर या पदावर नियुक्ती झाली आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत गेल्या अडीच वर्षापासून नांदेड येथे जिल्हाधिकारी पदावर होते. 30 सप्टेंबर 2022 रोजी ते नांदेड येथे जिल्हाधिकारी पदावर रुजू झाले होते.विविध जन उपयोगी उपक्रम ,सामान्य जनतेशी थेट संपर्क ठेवणारे अधिकारी, उत्कृष्ट प्रशासक म्हणून अभिजीत राऊत यांची कारकीर्द कायम स्मरणात राहणारी आहे.

Related Articles

ताज्या बातम्या