NANDED | धर्माबाद | युवा रक्षक वृत्तसेवा.
धर्माबाद ( प्रतिनिधी ):- मराठी पत्रकारितेचे पितामह दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनानिमित्त दि. 7 जानेवारी 2024 रोजी मंगळवारी दुपारी 1.00 वाजता शासकीय विश्रामगृह धर्माबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या वतीने दर्पणकार यांना अभिवादन करून करण्यात आले.यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीची सहसचिव वैभव कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे दिपक पाटील चोळाकेकर, माजी उपनगराध्यक्ष रमेश पाटील बाळापूरकर, जिल्हा सरचिटणीस किरण बेंद्रे पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी पाटील आलूरकर, शहराध्यक्ष नरेशरेड्डी आरकलवाड, महाबळेश्वर(सोनु) पाटील बन्नाळीकर, तालुका उपाध्यक्ष हनमंत पाटील किरोळे,माजी नगरसेवक बिरुपा मदनुरकर, तालुका कार्याध्यक्ष नारायण पाटील पवार , तालुका सरचिटणीस सतीश पाटील शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष गंगाधर धडेकर , कृष्णा मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील सर्व पत्रकारांचा वाटर बाटली, पेन, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी अध्यक्षीय समारोपात कृषी उत्पन्न बाजार समित सहसचिव वैभव कुलकर्णी यांनी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे .सामाजिक बांधिलकीचे ध्येय ठेवून पत्रकार हे सातत्याने समाज जागृतीचे काम करतात.आमचे वडील कै. विनायकरावजी कुलकर्णी यांच्या 38 वर्षाच्या राजकारणात सर्वात जास्त मदत पत्रकारांची झालेली आहे. कुलकर्णी परिवार आणि पत्रकार यांचे नाते पूर्वीपासूनच जवळचे होते त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी पत्रकारामुळेच साध्य करता आल्या. राजकारणात आपली कुठे चूक होत असेल तर ते निदर्शनास आणून देण्याचे काम पत्रकार करतो त्यामुळे आपल्या चुका सुधारण्यास मदत होते त्यामुळे पत्रकाराने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व निर्भीडपणे पार पाडावे , वडीलां नंतर मी आपल्या पाठीशी आहे अशी भावना व्यक्त केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सतीश शिंदे यांनी केले तर आभार गंगाधर धडेकर यांनी मानले…