NANDED | धर्माबाद | युवा रक्षक वृत्तसेवा
धर्माबाद ( प्रतिनिधी ) :- आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त धर्माबाद येथील शासकीय विश्रामगृहात येथे दर्पण दिन साजरा करण्यात आला.
यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक जी.एम.वाघमारे यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन दिप धुप प्रज्वलित करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार कृष्णा तिम्मापुरे यांनी खोट्या बातम्या प्रसिद्ध करून अडचणीत येण्यापेक्षा सत्यता पडताळूनच लिखाण करावे असे बोलून दाखवले,तर गंगाधर धडेकर यांनी पत्रकार ऊन पाऊस वारा यांची तमा न बाळगता रात्रंदिवस मेहनत करून तालुका व परिसरात घडलेली प्रत्येक घटना घडामोडींची माहिती संकलन करून वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घेतात.६ जानेवारी रोजी दर्पनकार बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस म्हणजे पत्रकार दिन यांच दिवशी दर्पणचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. असे म्हणाले यावेळी बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पोतन्ना लखमावाड, जेष्ठ पत्रकार कृष्णा तिम्मापुरे, गंगाधर धडेकर, महेश जोशी, रमेश कत्तुरवार, बालाजी बकावाड, बाबुराव गोणारकर, गणेश पाटील राजापुरकर, अशोक पडोळे, अब्दुल खदीर,गजानन चंदापुरे, यांनी उपस्थितीत होती.