NANDED | धर्माबाद | युवा रक्षक वृत्तसेवा.
धर्माबाद ( प्रतिनिधी ) :- महाराष्ट्रातील सर्वात अग्रणीय वृत्तसंस्था म्हणून पत्रकार संरक्षण समिती काम करीत आहे.शोषित वंचितांच्या प्रश्नांना शासन दरबारी निष्पक्ष पणे त्यांचे प्रश्न मांडणारी वृत्तसंस्था म्हणून पत्रकार संरक्षण समितीची सबंध महाराष्ट्रात ओळख आहे.
नुकतेच धर्माबाद येथील शासकीय विश्रामगृह येथे दिनांक 4 जानेवारी रोजी समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख मान्यवर म्हणून जिल्हा सचिव शशिकांत पाटील गाडे, जिल्हा उपाध्यक्ष मौलाना भाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा कार्याध्यक्षपदी डॉ. सुधीर येलमे यांची तर धर्माबाद तालुका अध्यक्षपदी चंद्रभीम हौजेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तालुक्यातील पुढील कार्यकारणी असे की, तालुका उपाध्यक्ष म. मुबशिर ,तालुका सचिव कृष्णा जाजेवार,कोषाध्यक्ष प्रियंका एडके, सहसचिव अरुण सोनटक्के, संघटक गजानन मुडेवार यांची निवड करण्यात आली आहे यावेळी चंद्रभीम हौजेकर यांना दिल्ली येथे भारतीय दलित अकादमीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार देऊन सन्मान मिळाल्याबद्दल आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्याने मित्र मंडळाच्या वतीने अभिष्टचिंतनाचा सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगतातून शुभेच्छा प्रदान केल्या आणि त्यांच्या निवडीच्या निमित्ताने मान्यवराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.