25.9 C
New York
Tuesday, July 8, 2025

Buy now

spot_img
spot_img

ॲड. मोहसीन यांच्या प्रयत्नांना यश; वसमत येथील फळभाजी विक्रेत्यांना व किरकोळ व्यापाऱ्यांना मिळाला न्याय…..

HINGOLI | वसमत | युवा रक्षक वृत्तसेवा

वसमत ( शेख एजाज ) :- वसमत येथे नववर्षाच्या सुरुवातीलाच दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी नगरपरिषद व महसूल प्रशासनातर्फे वसमत शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली होती या अतिक्रमित दुकानांमुळे शहरामध्ये रहदारीसाठी प्रचंड अडचण ही होत होती . त्याकरिता हे अतिक्रमण हटवणे अत्यंत गरजेचे होते. त्यासह या किरकोळ छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना योग्य ठिकाणी जागा उपलब्ध करून देणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे होते. कारण या छोट्या मोठ्या व्यवसायावर या लोकांचा व यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता; अतिक्रमणच्या नावाखाली फळभाजी विक्रेत्यांना फूटपाथवर बसून फळभाजी विकण्यास मनाई करून, फळभाजी विक्रेत्यांच्या मंडीवर जणू बुलडोजरच फिरवल्यासारखे कृत्य प्रशासनाने केले होते. यामुळे फळभाजी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली होती . याची जाणीव होताच वसमतचे माजी नगरसेवक तथा नावाजलेले वकील ॲड. मोसिन यांनी पुढाकार घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालय गाठून निवेदन देण्यात आले होते की, या गोरगरीब फळभाजी विक्रेत्यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना आपली फळभाजी विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी. अशी मागणी केली असता प्रशासन खडबडून जागे होत , तात्काळ या किरकोळ व्यापाऱ्यांना आठवडाभराच्या आतच जुन्या तहसीलच्या बाजूला असलेल्या गोडाऊन परिसरामध्ये या किरकोळ व्यापाऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आली असून , याविषयी व्यापाऱ्यांच्या वतीने ॲड.मोसीन यांनी प्रशासनाचे आभार मानले मानले आहे. व सर्व व्यापारी यांनी ॲड.मोहसीन याचे धन्यवाद करण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या