HINGOLI | वसमत | युवा रक्षक वृत्तसेवा.
वसमत (शेख एजाज) :- वसमत येथे अतिक्रमण च्या नावाखाली गोरगरीब फळभाजी विक्रेत्यांना शहरातील फूटपाथ वर बसण्यास बंदी घालून मुख्याधिकारी व तहसीलदार यांनी आपली पाठ थापटून घेण्याचा प्रकार पाहताच वसमत येथील माजी नगरसेवक तथा अॅड. मोहसीन यांनी गोरगरीब फळभाजी विक्रेत्यासाठी थेट उपविभागीय कार्यालय गाठून फळभाजी विक्रेत्यावरील होत असलेले अन्याय थांबवण्यात यावे अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे. गोरगरीब फळभाजी विक्रेते आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी फूटपाथ वर एका कोपऱ्यात विक्री करत असतात व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असताना अशातच अतिक्रमणच्या नावाखाली व वाहतुकीच्या कोंडीच्या नावाखाली फळभाजी विक्रेत्यांची प्रशासनाने केलेली कोंडी थांबवण्यात यावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.