NANDED | धर्माबाद | युवा रक्षक वृत्तसेवा.
धर्माबाद (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासन पुणे व युवक सेवा संचनालय तथा जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड आणि जिल्हा हाफकिडो बॉक्सिंग असोसिएशन यांच्या वतीने 22 डिसेंबर 2024 रोजी,तालुका क्रीडा संकुल इनडोर हॉल धर्माबाद येथे प्रथमच घेण्यात आलेल्या विभागीय शालेय क्रीडा स्पर्धत हापकिडो बॉक्सिंग स्पर्धेत जिल्हा परिषद मुलींची शाळा येथे चालत असलेले ड्रॅगन मार्शल आर्ट अकॅडमीच्या विविध शाळातील विद्यार्थयांनी विविध वजन गटात शास्त्रशुद्धरित्या प्रदर्शन करत लातूर विभागातून प्रथम येण्याचाा बहुमान मिळवत राज्यस्तरीय पातळीवर जाण्यासाठी पात्र ठरले आहेत.
या राज्यस्तरीय स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांकावर शरयू दत्तात्रय सीतावार, शर्वरी दत्तात्रय सीतावार, नंदिनी हनुमंत जाधव (कस्तुरबा गांधी शाळा) सावली श्रीदास वाघमारे, रागिनी काशिनाथ पांचाळ, सृष्टी मारुती चपळे, दिव्या राजू येवतीवाड, दुर्गा राजेंद्र हिंगणीकर या सर्व विद्यार्थिनींना श्री. चंद्रकांतजी आढाव सर,( हापकीडो बॉक्सिंग जिल्हा अध्यक्ष) व सौ रंजना आढाव मॅडम (स्वयंससिद्धस जिल्हा अध्यक्ष) तसेच ग्रँडमास्टर दत्तात्रय सीतावार यांचे मौलाचे मार्गदर्शन लाभले तर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धर्माबाद उर्दू एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष मोहम्मद जावेद सर तर प्रमुख पाहुणे म्हणून संघपाल भंडारे ( जीत कानडो जिल्हाध्यक्ष), व विशेष आमंत्रित पाहुणे म्हणून पत्रकार शेख रज्जाक होते. तर तालुका क्रीडा संयोजक श्री.अहमद लड्डा यानी सूत्रसंचालन केले यावेळेस प्रशिक्षक गौस खान, शहाबाज खान, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रतिनिधी अक्रम खान हे उपस्थित होते. या सर्व विद्यार्थी,यांचे अभिनंदन मुख्याध्यापक श्री.शणमुख बेबरेकर सर, श्री. गणेश शिंदे सर तसेच शहरातील क्रीडाप्रेमी व पालक वर्ग विद्यार्थी मित्रांकडून या सर्व विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.