4.3 C
New York
Thursday, April 17, 2025

Buy now

spot_img
spot_img

वसरणी नांदेड येथे क्रांतीसूर्य राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, शूर वीरांगणा झलकारीबाई यांच्या संयुक्तीक जयंतीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे- गुणवंत मिसलवाड.

NANDED | युवा रक्षक वृत्तसेवा.

नांदेड ( प्रतिनिधी ):- क्रांतीकारी राघोजी भांगरे प्रतिष्ठान वसरणी नांदेड यांच्यावतीने दि. 29 डिसेंबर 2024 रविवार रोजी सकाळी ठिक 10 वाजता आदिवासी आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे, धरती आबा बिरसा मुंडा, शूर वीरांगणा राणी झलकारीबाई यांच्या संयुक्तीक जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या भव्यदिव्य अशा जयंती सोहळ्यास नांदेड जिल्ह्यासहीत राज्यातील आदिवासी कोळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आदिवासी कोळी समाजाचे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड, या जयंती मंडळाचे अध्यक्ष तथा आयोजक भालचंद्र मोळके, उपाध्यक्ष नागनाथ मोळके, सचिव सुधाकर भिसे, सहसचिव बालाजी मोरे, संघटक बापूराव मोरे, सदस्य दिगांबर जटाळे व इतर सर्व सदस्य क्रांतीकारी, वीरांगणा झलकारीबाई सेना महिला मंडळाच्या अध्यक्षा लक्ष्मीबाई घोरपडे, उपाध्यक्षा रुक्मीणीबाई मोरे, सचिव वर्षाबाई सुर्यवंशी, सहसचिव शोभाबाई मोळके, कोषाध्यक्षा गीता वाघमारे, सदस्या सोनाली मोळके व इतर सर्व सदस्या व तमाम कोळीवाडा वसरणी नांदेड यांनी केले आहे.


या जयंती उत्सवामध्ये सर्वप्रथम महापुरुषांना अभिवादन, झाँकी मिरवणूक, निसर्ग आदिवासी दैवत पूजन, मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा, उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार तद्नंतर कार्यक्रम जाहीर सभेला सुरुवात होईल. या जयंती कार्यक्रमास नांदेड जिल्ह्यातील आजी- माजी आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, समाजनेते, प्रमुख वक्ते ही मान्यवर मंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असून या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने आदिवासी कोळी समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधी आणि समाज नेत्यांकडून विचारमंथन होणार आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील तमाम आदिवासी कोळी समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या