HINGOLI | वसमत | युवा रक्षक वृत्तसेवा.
वसमत ( ता. प्र. शेख एजाज ):- हिंगोली जिल्हा येथील वसमत येथे कन्हेरगाव रोड वर, पारुलनाथ फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी यांची NCCF व महाकिसान संघ कृषी FPC अंतर्गत आज पासून शासकीय हमीभावाने सोयाबीन खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे.
पारुलनाथ फार्मर्स कन्हेरगाव रोड वसमत खरेदी केंद्रावर शुभारंभ प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी शिवसेना सह संपर्कप्रमुख सुनील भाऊ काळे, भगवानराव डांगरे, अरुणराव सदावर्ते, प्रशांतराव भडके पाटील, साठा अधीक्षक त्रंबकराव डोंबे साहेब, राजेश्वर स्वामी, अजय सदावर्ते, सौरभ सदावर्ते, इलियास भाई पत्रकार, इस्तियाक कुरेशी, शेतकरी शिवाजीराव भोसले, बंडू पडोळे, विठ्ठल जगताप, अनिल जोंधळे मुकादम वामनराव वाघमारे व अन्य सहकारी वर्ग शुभारंभास उपस्थित होते.