11.1 C
New York
Monday, April 7, 2025

Buy now

spot_img
spot_img

धर्माबाद पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी ; घरफोडीचा आरोपीस केले 48 तासात अटक…..

NANDED | धर्माबाद | युवा रक्षक वृत्तसेवा.

धर्माबाद ( प्रतिनिधी ) :- धर्माबाद शहरातील एक गणेश नगर भागात एक घरफोडी झाली होती, फिर्यादी रामपुरे व त्यांची पत्नी हे शेताकडे गेले असता दि. 13 डिसेंबर रोजी दिवसा सकाळी 10 ते 11 च्या दरम्यान सदरची चोरी झाली होती, त्या चोरीतील एकमेव असणाऱ्या आरोपीस धर्माबाद पोलिसांनी अटक केली आहे.

सदरचा आरोपी हा शहरातील नामांकित शाळेचा बस चालक असून त्याचे नाव श्रीकांत विठ्ठलराव बनसोडे वय 27 रा. बेल्लूर बु.असे असून तो बस क्रमांक 9 चा चालक म्हणून कार्यरत होता, त्याने गणेश नगर येथील फिर्यादी लक्ष्मण मोहनराव रामपुरे यांच्या घरात भरदिवसा कुणी नसल्याची संधी साधून घरफोडी केली होती, सदर प्रकरणात गुन्हा नोंद होताच अवघ्या 48 तासात पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणले होते, ह्या प्रकरणात घरफोडी झाल्याची माहिती मिळताच सपोउपनि भालेराव व त्यांचे सहाय्यक पोकॉ विठ्ठल सुपारे यांनी आवश्यक असणारी प्राथमिक माहिती गोळा केली होती, कारण घराचे कुलूप सुद्धा तोडले गेले नव्हते? त्या सोबतच कडी कोंडा देखील जश्यास तसा होता, डुप्लिकेट चावीचा आधार घेत कुलूप काढण्यात आले होते, त्यामुळे झालेला प्रकार वेगळा असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रोकडे यांना दिली असता पोनि रोकडे यांच्या आदेशाने श्वान पथक व ठसे तज्ञ यांना पाचारण करत माहिती  मिळवण्याचा प्रयत्न केला होता परंतु निराशा हाती आली होती, सदरच्या ठिकाणी कुठलेच सिसीटीव्ही कॅमेरे देखील नसल्याने अडचण निर्माण झाली होती, परंतु धर्माबाद पोलिसांनी आपले कौशल्य पणाला लावत हा प्रकार काहीसा वेगळा असल्याचे सिद्ध करत उपयोगी माहिती गोळा करत पोनि रोकडे यांना आवश्यक असणारी माहिती प्राप्त करून दिली होती, पोनि रोकडे झालेल्या चोरीचा प्रकार हा काहीसा वेगळा असल्याचे लक्षात येताच स्वतः तपासाची सूत्रे हाती घेत कसून तपास करत अवघ्या 48 तासाच्या आत आरोपी जेरबंद केले असून ह्या कामी पोलीस उपनिरीक्षक पवार मॅडम, पोहेकॉ मुस्तापुरे, पोहेकॉ माकूरवार तसेच पोकॉ सचिन  गडपवार यांनी हा गुन्हा उकल करण्यात महत्वाची भूमिका बजावले आहेत.

सदरील आरोपीकडून सोन्याच्या पाटल्या, एक पोहेहार, सोन्याचे नानू, अंगठ्या,सोनसाखळी, झुमके, सोन्याचे लॉकेट, असे मिळून एकत्रितपणे 132.47 ग्राम वजन असलेले 100% ऐवज जप्त केला असल्याची माहिती पोनि रोकडे यांनी आज रोजी सकाळी 11 च्या सुमारास पत्रकारांशी बोलताना सांगितले आहेत. सदर प्रकरणात पोलिसांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल धर्माबाद वासियांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानत त्याचे भरभरून कौतुक केले आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या