NANDED | धर्माबाद | युवा रक्षक वृत्तसेवा.
धर्माबाद ( प्रतिनिधी ):- दरवर्षी प्रमाणे या वर्षीही श्री. विठ्ठलेश्वर मंदिर येथे श्री. संत ब्र.भु.रंगनाथ महाराज परभणीकर (गुरुजी) यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले, असल्याची माहिती श्री. संत रंगनाथ महाराज परभणीकर सेवा समिती धर्माबाद च्या संयोजकांनी उपोरोक्त प्रतिनिधीशी बोलताना दिली.
धर्माबाद येथील अखंड हरिनाम सप्ताह चे ४३ वे वर्ष आहे. वारकरी संप्रदाय मध्ये वेदांत सोपा करून सांगण्याचे कार्य महाराजांच्या हातून घडले आहे. त्यांनी किर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे खूप मोठे कार्य केले आहे. या अखंड हरिनाम सप्ताहात, श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी प्रवचनाला दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत या वेळेत हभप माधवराव वारले गुरुजी यांचे होणार आहे.दि.२०/१२/२४. ते २७/१२/२४ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आसुन पहाटे पाच ते सहा काकडा आरती,सकाळी साडे सहा ते साडे नऊ श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आकरा ते बारा गाथा भजन दुपारी दोन ते चार श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी प्रवचनमाला, सायंकाळी पाच ते सात हरिपाठ,रात्री आठ ते दहा हरिकिर्तण,नंतर जागर भजन चे आयोजन करण्यात आले आहे.
दि. २० रोजी हभप माणिक महाराज शास्त्री गंगाखेडकर,दि २१ रोजी हभप माधव महाराज बोरगडीकर,दि. २२ रोजी हभप मारोती महाराज गिते इंद्रेवेलिकर,दि. २३ रोजी हभप श्रीधर महाराज कासराळीकर,दि. २४ रोजी हभप योगेश महाराज अग्रवाल वसमतकर,दि.२५ रोजी हभप बाबु महाराज काकंडीकर,दि.२६ रोजी हभप निळोबा महाराज हरबळकर,दि. २७ रोजी हभप निळोबा महाराज हरबळकर यांचे काल्याचे किर्तन व सकाळी १० ते १२ वाजता व नंतर महाप्रसाद आयोजन करण्यात आले आसुन धर्माबाद व परिसरातील सर्व धर्मप्रेमी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन समिती द्वारे कळविण्यात आले आहे.