प्रशिक्षणामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी घेऊन , प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा –
श्री. मारोतराव पाटील कवळे गुरुजी.
NANDED | उमरी | युवा रक्षक वृत्तसेवा
उमरी ( प्रतिनिधी ):- व्ही. पी. के. उद्योग समूहातील तिन्ही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते की दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हि. एस. आय.) मांजरी (बू.) पुणे येथे “ऊस शेती ज्ञानयाग” प्रशिक्षण दि. २४/१२/२०२४ ते २७/१२/२०२४ या कालावधीत आयोजीत करण्यात आला आहे.चार दिवस निवासी प्रशिक्षण असल्यामुळे राहण्याची व जेवणाची सोय त्याच ठिकाणी करण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षणात ऊस लागवड व उसाचे संपूर्ण व्यवस्थापन कसे करावे याचे शास्त्रज्ञा द्वारे सखोल मार्गदर्शन व प्रात्यक्षिक दाखवले जातात, त्या अनुषंगाने आपल्या भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे व आपला शेतकरी एकरी शंभर टन उत्पादन घेतला पाहिजे या हेतुने प्रशिक्षणास जाणाऱ्या शेतकऱ्याच्या खर्चाची निम्मी रक्कम कारखाण्या मार्फत भरण्याचा निर्णय व्ही.पी. के उद्योग समूहाचे चेअरमन श्री. मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी घेतला आहे . तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.
दि.१८/१२/२०२४ पर्यंत आपली नाव नोंदणी, आपल्या गटातील कृषी सहाय्यक यांच्याकडे करणे बंधनकारक आहे.प्रशिक्षणाचा व प्रवासाचा निम्मा खर्च ३०००/- रूपये रोख व आधार कार्ड चे झेरॉक्स प्रत देणे बंधनकारक आहे.कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रशिक्षणात सहभाग घ्यावा. या प्रशिक्षणात सहभाग घेण्यासाठी श्री.पडवाळे मो. ८०१०२३८०२०व श्री. सावंत मो. ७४४७४६२६१४ यांना संपर्क करावे अशी विनंती करण्यात आली आहे.