NANDED | अर्धापूर | युवा रक्षक वृत्तसेवा.
अर्धापूर ( प्रतिनिधी ) :- अर्धापूर येथे जिल्हास्तरीय होणाऱ्या ३१ डिसेंबर व १ जानेवारी तब्लीगी इज्तेमा ची जोरदार तयारी सुरु आहे. मागील एक महिन्यापासून या ठिकाणची नियोजनाची तयारी सुरू आहे हजारो तरुण दिवस-रात्र मेहनत घेत आहेत.
जिल्हास्तरीय दोन दिवसीय तब्लीगी इज्तेमा या धार्मिक कार्यक्रम अर्धापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून लाखो लोक सहभागी होणार आहे. या इज्तेमासाठी दोनशे एकर जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. ५० एकरात मंडप उभारण्यात आला असून, ५० एकरामध्ये हॉटेल दुकान यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. तसेच दोन ते तीन ठिकाणची पन्नास- पन्नास एकर जमीन वाहनाला पार्किंग साठी ठेवण्यात आली आहे. नांदेड शहराकडून येणाऱ्या वाहणासाठी वेगळी पार्किंग व्यवस्था असेल, तसेच हदगाव व तामसा मार्गेकडून येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था वेगळी करण्यात आली आहे. इज्तेमा मध्ये येणाऱ्या लोकांची सुविधासाठी अनेक उपाययोजना करण्यात आले आहे. पाण्यासाठी पाच विहिरी तसेच अनेक ठिकाणी शौचालयाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. नागरिकांना नमाजाच्या आधी वजू करण्यासाठी नळ योजना करण्यात येत आहे.आंघोळ करण्यासाठी सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. तब्लीगी इज्तेमा मध्ये येणाऱ्या प्रमुख पाहुण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये सगळी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
तब्लीगी इज्तेमा मध्ये येणाऱ्या नागरिकांना मोफत जेवण आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विजेसाठी दोन ते तीन जनरेटर चा वापर करण्यात येत आहे. यासाठी मुस्लिम स्वयंसेवक दिवस रात्र परिश्रम घेत आहे. येथील नियोजन पाहून लाखोच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.